कुंडलितील सहावे स्थान हे रोग, शत्रू, कर्ज, नोकरी, हाताखालील कामगार, मातुल घराण्याशी संबंध म्हणजे मामा, मावशी, सेवेच्या कामाचे, तसेच स्पर्धा परीक्षा याचे प्रतिनिधित्व करते. हे सप्तम स्थानाचे व्यय स्थान आहे. इथे पाप ग्रह असेल तर वैवाहिक जीवनात अडचणी येतात. कधी कधी विवाह विच्छेद पण होतो.
अष्टक वर्ग नुसार लग्न स्थानापेक्षा षष्ठ स्थानाला कमी बिंदू असतील तर चांगले असते. संघर्ष कमी.
पण समजा षष्ठ स्थानाला लग्न स्थाना पेक्षा जास्त बिंदू असतील तर जास्त संघर्ष करावा लागतो. कर्ज आजार, प्रॉपर्टी,गुप्त शत्रू या पासून त्रास होतो.
पण अगदीच हा नियम 100 % नाही, कारण षष्ठ स्थान स्ट्रॉंग असेल तर बॉस, हाता खालील कामगार यांचे चांगले सहकार्य मिळते. शनी, मंगळ चांगले बिंदू असतील तर गुप्त शत्रू पासून संरक्षण करतो. गुरु, शुक्र चांगले बिंदू असतील तर कर्ज फिटते. बुधाला चांगले बिंदू असतील तर मावशी, मामा यांच्याशी चांगले संबंध असतात.
अलीकडच्या काळात काही कुंडल्या बघीतल्या, त्यातील 90% पेक्षा जास्त कुंडलीत षष्ठ स्थानाला खूप जास्त बिंदू आहेत, अगदी 38,41 इतके बिंदू आहेत. त्यातील काही जणांनी competitive exam crack केल्या आहेत व चांगल्या पोसिशन वर नोकरी करत आहेत. कुणी university मधे topper आले आहे. तर या पद्धतीने बघू शकतो.