गुरु ग्रहा बद्दल

गुरु उर्फ बृहस्पती, देवांचे गुरु म्हणून त्यांना देवगुरू पण म्हणतात.

गुरु ग्रहा बद्दल शनि महात्म्य मधे हे लिहिले आहे :

गुरुज्ञानाचा न कळे पार ॥ भाविकांसी तो करुणाकार ॥ कर्माकर्मांचा करी चुर ॥ भवभयव्यथेसी ॥

दुःख आणि दरिद्र्य रोग ॥ स्मरणमात्रें होती भंग ॥ नवग्रहांत महायोग्य ॥ ऐसा जाणिजे ॥

म्हणोने करितां गुरुसेवा ॥ मग ग्रहांचा कोण केवा ॥ गुरु सर्वभार्वे भजावा । तेणे संतोष सर्व ग्रहांसी ॥

शिव करी गुरुपुजनासी । तेथें पाड काय इतरांसी । ऐसा श्रेष्ठ जो सर्वांसी ॥ आगमागम !!

स्वतः शनि देवानी मान्य केले की गुरु हा सर्वामध्ये श्रेष्ठ आहे. गुरु ही माऊली आहे, सदा कृपेची सावली आहे.

अशा या गुरु ग्रहा विषयी लिहावे तेवढे थोडेच आहे.

गुरुला अत्यंत पवित्र व शुभ ग्रह मानले आहे. गुरु शुभ तर सर्व शुभ.

गुरु ला कुंडलित तीन दृष्टी आहेत पंचम, सप्तम व नवम. कुंडलित पंचम स्थान – शिक्षण, प्रणय, संतती. उच्च शिक्षण. सप्तम – वैवाहिक जोडीदार,नवम भाग्य स्थान आहे. या स्थानावर गुरु ची अमृत दृष्टी पडली तर शुभ फळं मिळते.  गुरु एका राशीत साधारण 13 महिने असतो. गुरु कर्क राशीत उच्चीचा असतो. मकर राशीत निचेचा असतो.

गुरु म्हणजे विद्वान, विद्वता, नैतिकता.शिक्षक, प्रोफेसर, मार्गदर्शक, संत, धार्मिक गुरु.

गुरु ज्या स्थानात आहे तिथे वृद्धी करतो, तो व्यक्तीच वजन पण वाढवतो…

गुरु चांगला असेल तर व्यक्ती उदार, दान धर्म करणारी असते.

गुरु चांगला असेल तर आजारी माणूस बरा होतो. गुरु चांगला असेल तर कर्ज फिटते.

नोकरी मिळणे, प्रमोशन,मान सन्मान, कीर्ती, या सर्व गोष्टी गुरु चांगला असेल तर मिळतात. तीर्थ यात्रा घडते. घरात धार्मिक कार्यक्रम होतात. चंद्र, गुरु युती केंद्र स्थानी असेल तर गजकेसरी योग होतो जो अत्यंत शुभ मानतात.

गुरु मुळे मनुष्य अध्यमिक पण होतो व भौतिक सुख पण प्राप्त करतो.

गुरु ची महादशा 16 वर्षाची असते व निश्चितच खूप शुभ फळं देते.

कुंडलित इतर ग्रहा बरोबर युती, त्यांचे स्थान, राशी यावर फलित अवलंबून राहील.