गुरु राहू युती – चांडाळ योग

गुरू व राहू एका राशीत अंशात्मक युतीत असताना गुरूचे कारकत्व राहू मुळे दिसत नाही. गुरू हा ज्ञान , विवेक याचा कारक आहे. गुरू चांडाळ असलेल्या व्यक्ती ला शैक्षणिक यश मिळताना अडथळे येतात. साधे व्यवहार ज्ञान संपादन करता येत नाही. विवेक नसल्यामुळे निर्णय चुकतात. गैरसमज लवकर होतात.

गुरू संततीचा कारक असल्यामुळे गुरू चांंडाळ योगात यामुळे अडचणी येतात.

परंपरेनुसार चांडाळ याचा अर्थ क्रूर किंवा नीच कर्म करणारा मानला जातो. म्हणूनच सत्प्रवृत्ती जेव्हा अशा वृत्तीच्या संपर्कात येते तेव्हा त्यास चांडाळयोग असे म्हटले जाते. 

सर्वसाधारणपणे गुरु हा ग्रह शुभग्रह मानला जातो – जो ज्ञान, बुद्धि चा कारक आहे. तर राहू हा छायाग्रह दैत्य मानला जातो. फसवणूक करणे, भ्रमाचे मृगजळ, शंकाकुशंका देणे इ. चा राहू कारक मानला जातो. म्हणूनच गुरु आणि राहू या दोन भिन्न/परस्परविरोधी तसेच शुभ आणि पाप ग्रहांची युती हा किंवा हे ग्रह एकमेकांच्या संपर्कात येणे याला चांडाळ योग असे म्हणतात. हा अर्थातच चांगला योग मानल जात नाही. आर्थिक संकट येणे, अर्थनाश, कर्ज किंवा अयोग्य संगतीमुळे नुकसान होणे असे या योगाचे फलित सांगितले जाते.

येथे हे ध्यानात घेतले पाहीजे की कुंडलीत चांडाळ योग दिसला की लगेच वरील फलित प्राप्त होते असे नाही. तसे मानून चिंता करणे अयोग्य आहे. कुंडलीतील इतर ग्रह/राशी स्थिती, बलाबल, दशा इ. अनेक घटकांवर फलिताची तीव्रता किंवा सौम्यत्व अवलंबून असते. तेव्हा निष्कर्षावर येण्याची घाई करणे अयोग्य ठरेल.

आपण सर्वांनी मागच्या वर्षी गुरु – राहू

युती चे फलित संपूर्ण जगात बघितले.

जवळ जवळ सर्वांना तो कालावधी खूप कठीण गेला. ऑक्टोबर नंतर जेव्हा राहू चे राशी परिवर्तन झाले त्यानंतर फरक पडला…

गुरु व महादेवाची उपासना करणे हाच यावर चांगला उपाय आहे.