घटस्फोट योग

सध्या असा काळ सुरु आहे जिथे घटस्फोट ही खूप मोठी समस्या झाली आहे. लग्न होणे कठीण, झाले तर टिकणे कठीण…

लग्ना नंतर एक, दोन वर्षातच प्रॉब्लेम सुरु होतात व शेवटी परिणीती घटस्फोटात होते…

हे का होत आहे…. पत्रिकेत असे काय योग आहेत की ज्या मूळे ही परिस्थिती येते…

कुंडली बरोबरच सध्या चे ट्रेंड पण लक्षात घेतले पाहिजे, पूर्वी पण असे योग नव्हते का.. की आताच आले हा खूप मोठा विषय आहे…

Maturity न दाखवल्या मूळे घटस्फोट वाढले आहेत…

कुंडलित पाप ग्रह असा योग दाखवतात, पण होईलच असे नाही, ते शेवटी    नवरा -बायको दोघांच्या हातात आहे.

कुंडली जुळवताना म्हणून चंद्र राशी – ग्रह मैत्री बरोबरच, लग्न राशी ग्रह मैत्री पण बघितली पाहिजे…

व्ययातला मंगळ जास्त धोकादायक आहे, व त्या बरोबर तो जर लग्नेश, सप्तमेश किंवा अष्टमेश शी संबंध असेल तर खूपच प्रॉब्लेम…

सप्तमेश राहू, शनि, रवि, केतू जर षष्ठ स्थानात असेल तर विवाह विच्छेद योग असतात, पटत नाही… शेवटी घटस्फोट मधे रूपांतर होते…

दोघाच्या कुंडलित जर पाप ग्रह सप्तमेश, षष्ठ स्थानी, अष्टम स्थानी, व्यय स्थानी असतील तर खूप चान्सेस आहेत..

घटस्फोट होणार नाही या साठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे…