या बद्दल वेगवेगळी मतांतरे आहेत. पितृदोष किंवा कुंडलितील दोष हे वेग वेगळ्या प्रकारचे असतात.
उदा :
कुंडलीत रवि बरोबर राहू किंवा रवि बरोबर चंद्र हा ग्रहण योग होतो.
राहू बरोबर मंगळ असेल तर अंगारक दोष होतो.
राहू बरोबर शनि असेल तर प्रेतशाप योग होतो
राहू बरोबर गुरु असेल तर चांडाळ योग होतो.
शनि बरोबर रवि असेल तर पितृ दोष होतो.
शनि बरोबर चंद्र असेल तर विष योग होतो.
रवि बरोबर चंद्र असेल तर अमावस्या योग होतो.
हे पत्रिकेत किती प्रभावी आहे हे त्या स्थानावर अवलंबून आहे.
तसेच वेग वेगळ्या प्रकारचे ऋण असतात.
पूर्वजांचे ऋण :
मातृ ऋण, भगिनी ऋण, स्त्री ऋण, कन्या ऋण असे प्रकार आहेत व त्या स्थानातील कुठले ग्रह आहेत त्यावर अवलंबून आहे.
या सगळ्या गोष्टी साठी उपाय आहेत.
हा ज्याच्या त्याच्या विश्वास आहे की नाही त्यावर अवलंबून आहे…
पण माझ्या बघण्यात ज्या व्यक्ती आहेत, त्यांना उपाय सांगितला व त्यांनी उपाय केल्यावर खूप फायदा झाला. बरीच वर्ष अडकलेली कामे झाली. शुभ कार्य झाले.