हा पण इंटरेस्टिंग विषय आहे.
गुणमेलन करतांना बऱ्याच वेळा आपण हे बघतो, पत्रिका जुळते आहे, पण पंचांगात जिथे गुण लिहिले असतात त्याच्या खाली 7 अंक लिहिला असतो, तो काय आहे तर तो षडाष्टक योग दाखवतो.
किंवा काही जण software ने कुंडली match करतात तेथे भकूट 0 असे येते… कारण software मधे general डेटा भरला असतो…
मग हे षडाष्टक काय आहे?
दोन प्रकारचे षडाष्टक योग असतात
1.मृत्यूषडाष्टक
2 प्रितिषडाष्टक
कोणताही षडाष्टक योग हा राशींच्या त्यांच्या मूळ स्वभावगुणधर्मावर आधारीत आहे… राशींचा मूळ स्वभाव जर एकमेकांना मिळता जुळता असेल तर त्याला प्रितीषडाष्टक म्हणून ओळखले जाते. आणि अगदी याच्या विरूद्ध राशींचा स्वभाव मिळता जुळता नसेल तर त्याला मृत्यूषडाष्टक असे म्हणतात..
पण प्रितिषडाष्टक पेक्षा मृत्यूषडाष्टक चा प्रामुख्याने जास्त विचार केला जातो.. बऱ्याच वेळा जनरली काय करावे यापेक्षा काय करू नये याची लिस्ट मोठी असते..
सर्वप्रथम मृत्यूषडाष्टक योगाला मृ्त्यूषडाष्टक योग असे का म्हणले जाते ते पाहू. कारण बऱ्याच वेळा मृत्यू या शब्दाला पाहूनच काही लोकांची भितीने गाळण उडते…. पण प्रत्यक्षात तस काहीच होत नाही… पुढील उदाहरणावरून सहज लक्षात येईल.
मेष रास म्हणजे एक घाव दोन तुकडे याऊलट कन्या म्हणजे वाटाघाटी.
मेष राशीच्या लोकांना वाट बघायची नसते. हुज्जत घालत बसत नाहीत. ऑन दि स्पॉट निर्णय घेऊन मोकळे होतात. नंतर होणाऱ्या परिणांमाचा ते फार विचार करीत नाहीत. बऱ्याच वेळा या स्वभावाचा त्यांना तोटा देखील होतो.
याच्या पुर्णपणे उलट म्हणजे कन्या रास. कोणताही निर्णय घेताना 100 वेळा विचार करणार, विचार पटत नसतील तर हुज्जत घालत बसणार,,, काहीही करून समोरील वक्तीला हरवूनच शांत बसतात. नसत्यां शंका विचारून डोके भंडावून सोडतात. घेतलेल्या निर्णायाचे नंतर काय परिणाम होतील ह्यावर विचार करून स्वत:चे आणि समोरील व्यक्तीचे दोघांचेही डोके खातात.. बऱ्याच वेळा हातातून वेळ निघून गेल्यावर निर्णय घेऊन मोकळे होतात…
आता ही अशी परस्पर विरोधी स्वभावाची माणसे एकत्र नांदतील का..त्यांच्यात कायम खटके उडत राहतील, अजिबात पटणार नाही.. मृत्यू तुल्य वेदना म्हणजे मृत्यू षडाष्टक
दुसरे उदाहरण कर्क आणि कुंभ राशीचे घेता येईल..
कर्क राशी निखळ मनाची प्रेमळ अशी म्हणता येईल,, अश्या कर्केच्या लोकांचे कुंभेच्या विज्ञानवादी लोकांशी अजीबात पटत नाही.. एकाला किचन आवडते तर दुसऱ्याला ग्रंथालय सोडू वाटत नाही.. सतत विज्ञान विज्ञान ची माळ चालू असते.. 12 राशीपैंकी सर्वात रोमॅंटीक रास कोणती असेल तर ती कर्क रास म्हणता येईल.. तर तिकडे कुंभेचे लोक ह्या रोमॅंटीकपणापासून जरा दुरच असतात..
हे सगळ झाल तर मृ्त्यूषडाष्टक च्या बाबतीत, प्रिती षडाष्टक च्या बाबतीत याच्या उलट होत..
पुढे काही दोन तिन उदाहरणे बघू या :
मेष – वृश्चिक राशी.. दोघांचाही मालक मंगळ, अधुन मधून कुरूबुरी असल्या तरी ते नात रडत खडत सुरु रहात.
वृषभ आणि तुळ या दोघांचाही मालक शुक्र.. दोघेही रोमॅंटीक, एक दुजे के लिये असा स्वभाव..
कर्केची पत्नी ही धनु सारख्या द्विस्वभावी व्यक्तीला सहज समजून घेईल…
पंचागात टेबलं दिला आहे त्या वरून कोणत्या राशीचे कोणत्या राशीसोबत मृ्त्यूषडाष्टक आणि प्रितीषडाष्टक योग होते ते कळते.