आपण जेव्हा जन्माला येतो, त्या वेळेस जे 9 ग्रह आहेत, ते कुठल्या राशीत, कुठल्या भावात, कुठल्या नक्षत्रात आहेत व किती डिग्री वर आहेत ते दर्शवतात. चंद्र ज्या राशीत असतो ती चंद्र राशी व पूर्व दिशेला जीं राशी उदित होते (आपल्या जन्माच्या वेळी ) ती लग्न राशी. हे ग्रह आयुष्यभर एका राशींतून दुसऱ्या राशीत जात असतात, फिरत असतात. त्याला आपण ग्रहा चे गोचर म्हणतात.
कुंडलित 1 ते 12 अंक लिहिले असतात, ते राशी चे अंक असतात. 1 म्हणजे मेष रास, 2 म्हणजे वृषभ रास, असे 12 अंक असतात. ग्रहएका राशींतून दुसऱ्या राशीत जातो म्हणजे तों 30 डिग्री पार करतो.
अष्टक वर्ग मधे हे ग्रहाचे गोचर महत्वाचे आहे तसेच जेव्हा तो गोचर करतो तेव्हा तो प्रत्येक ग्रहा च्या कक्षेतून जातो. ह्या कक्षा फिक्स असतात.
पहिली कक्षा शनि ची, दुसरी गुरु ची, तिसरी मंगळाची, चौथी सूर्याची, पाचवी शुक्र, सहावी बुध, सातवी चंद्र व आठवी कक्षा लग्न असे तो बारा राशींतून गोचर करतो.
शनि हा सर्वात हळू चालणारा ग्रह आहे म्हणून त्याला पाराशर ऋषींनी पहिली कक्षा दिली. त्याहून थोडा वेगवान गुरु म्हणून दुसरी, नंतर मंगळ असे बाकी ग्रहाना त्यांच्या वेगा नुसार कक्षा दिल्या आहेत.
शनि – 0 डिग्री ते 3 डिग्री 45 मिनिट ही पहिली कक्षा
गुरु – 3 डिग्री 45 मिनिट ते 7 डिग्री 30 मिनिट दुसरी कक्षा
मंगळ – 7 डिग्री 30 मिनिट ते 11 डिग्री 15 मिनिट तिसरी कक्षा
सूर्य – 11 डिग्री 15 मिनिट ते 15 डिग्री चौथी कक्षा
शुक्र – 15 डिग्री ते 18 डिग्री 45 मिनिट पाचवी कक्षा
बुध – 18 डिग्री 45 मिनिट ते 22 डिग्री 30 मिनिट सहावी कक्षा
चंद्र – 22 डिग्री 30 मिनिट ते 26 डिग्री 15 मिनिट सातवी कक्षा
लग्न – 26 डिग्री 15 मिनिट ते 30 डिग्री. आठवी कक्षा
या नंतर तो दुसऱ्या राशीत जातो.
आता अष्टक वर्ग, व प्रत्येक ग्रहा च्या भिन्नष्टक मधे बघावे की आज कुठला ग्रह, कुठल्या राशीत व कुठल्या कक्षेत आहे. भिन्न ष्टक मधे त्याला बिंदू दिला आहे की नाही, त्या नुसार गोचर चे फळ मिळेल. तसेच कुठली महादशा, अंतर दशा सुरु आहे त्या प्रमाणे फलादेश करता येतो. येणारा कुठला कालावधी चांगला आहे ते सांगू शकतो.
त्यामुळे ग्रहा च्या कक्षेचा अभ्यास महत्वाचा आहे.
आपण जरूरु आपल्या स्वतःच्या पत्रिकेचा या प्रमाणे अभ्यास करावा व आपला अनुभव शेयर करावा. आजचा दिवस कसा आहे, किती ग्रह शुभ आहेत, किती ग्रहा ने शुभ बिंदू दिले आहेत…हे सर्व आपण बघू शकतो. वरील ग्रहा च्या डिग्री चा टेबलं आपल्या समोर ठेवावा व बघावे आजच्या गोचर मधे ग्रह किती डिग्री वर आहे, म्हणजे आपल्याला लगेच कळेल की तो कुठल्या कक्षेत आहे…
उदाहरण :
सध्या गुरु वृषभ राशीतून भ्रमण करत आहेत. व सध्या गुरु चंद्रा च्या कक्षेतून गोचर करत आहे.
गुरु चे अष्टक वर्गात वृषभ राशीत किती बिंदू दिले ते बघावे , तसेच गुरु चे भिन्नष्टक बघावे व चंद्रा ने गुरु च्या भिन्नष्टक मधे बिंदू दिला की नाही ते बघावे. 0 दिला की 1 हे बघावे.
शून्य म्हणजे सध्या गुरु या कक्षेत ठीक नाही.. 1 म्हणजे सध्या या कक्षेत शुभ आहे व शुभ फळ देईल.
हेमंत उपासनी,ज्योतिर्विद्या वाचस्पती व अष्टक वर्ग तज्ञ्, बडोदा