भाग्योदय कधी होईल?

बरेच वेळा जातक विचारतो की माझा भाग्योदय कधी होईल.. किंवा प्रगति कधी होईल

कुंडलीतील नवम स्थान भाग्यस्थान मानले जाते. यावरून भाग्योदय, आध्यात्मिक प्रगती, ग्रंथलेखन, तीर्थयात्रा,  तत्त्वज्ञान, बुद्धिमता, गुरु, नावलौकिक, परदेशगमन योग अशा काही गोष्टी पाहिल्या जातात.

भाग्योदय कधी याचा विचार गोचर ग्रह,  दशा काल यांचे  ज्या कारणासाठी हे ग्रह आहेत त्यांचा भाग्यवर्षांवरूनही ठरवता येतो.

नवमस्थानातील चंद्र, बहुधा चांगली फले देतो. असा जातक सामाजिक कार्यकर्ता, व्यवहारकुशल, जनप्रिय,  समाजात प्रतिष्ठित, भ्रमणप्रिय असतो. देश-विदेशात प्रवासाच्या संधी मिळतात. अशा जातकाचा भाग्योदय २४ व्या वर्षी होतो. परंतु चांगली प्रगती विलंबाने म्हणजे मध्यायुत होते. बहुधा असा जातक विचारवंत व सदाचरणी असतो.

भाग्योदयाचे वर्ष ग्रहावरून जाणून घेऊ.

एखाद्या व्यक्तीचा भाग्येश गुरू असेल तर १६व्या वर्षी, सूर्य २२व्या वर्षी, चंद्र २४व्या वर्षी, शुक्र असल्यास २५व्या वर्षी, मंगळ असेल तर २८व्या वर्षी. , 32 व्या वर्षी बुध असेल आणि शनी असेल तर 36 व्या वर्षी भाग्य आहे.

कुंडलीच्या नवव्या किंवा दहाव्या घरात मंगळ कुंडलीमध्ये सिंह राशीसह असेल तर अशा लोकांना त्यांच्या करिअरमध्ये लवकर यश मिळते.

जर शनि किंवा गुरु प्रतिगामी असेल आणि एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील नवव्या भावात स्थित असेल तर त्यांच्या स्वतःच्या दशात हे ग्रह भाग्योदयाचे मजबूत योग करतात.

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिपासून पुढच्या घरात गुरु असतो, अशा व्यक्तीची वयाच्या २१ ते २२ व्या वर्षी कमाई सुरू होते.

कुंडलीतील तिसरे आणि दहावे घर

ज्याच्या कुंडलीमध्ये सर्वात जास्त ग्रह तिसऱ्या किंवा दहाव्या घरात आहेत, अशा व्यक्तीला भाग्यवान मानले जाते. ज्योतिषांच्या मते, अशा लोकांना लवकरच कार्यक्षेत्रात यश मिळते.

गुरू-मंगळ आणि शुक्राची स्थिती

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरू मेष राशीत, मंगळ मकर राशीत आणि शुक्र कुंडलीच्या नवव्या घरात असतो, अशा व्यक्ती आपल्या करिअरमध्ये उंची गाठतात.

सूर्य आणि चंद्र कर्क राशीत, शुक्र आठव्या भावात, मंगळ अकराव्या भावात असेल तर , अशा व्यक्तीला जीवनात सर्व दिशांनी वैभव प्राप्त होते.

अष्टक वर्ग प्रमाणे, नवम स्थानाला चांगले बिंदू असतील तर त्या व्यक्तीला भाग्याची चांगली साथ लाभते.

बरेच वेळा लग्न स्थान पॉवरफुल असते पण भाग्याची साथ नसते म्हणून प्रगति होत नाही.

काही जणांचा भाग्योदय लग्न झाल्या वर होतो. पार्टनर ची साथ लाभते.