शुक्र ग्रहा विषयी

शुक्र हा नवग्रह मधला एक जबरदस्त ग्रह आहे.

शुक्राचार्य हे दैत्य गुरु होते. त्यांच्याकडे संजीवनी विद्या होती, त्यामुळे मृत दैत्यांना पुन्हा जीवित करायचे. ही विद्या देवांकडे पण नव्हती.. असो त्यामुळे उगीचच शुक्र ग्रहाचे नाव खराब झाले आहे.

शुक्र हा शुभ ग्रह आहे. लाभदायक ग्रह आहे. शुक्र म्हणजे रसिक, शुक्र म्हणजे प्रेम, प्रणय. शुक्र म्हणजे glamour – अत्यंत आकर्षक सौंदर्य. शुक्र म्हणजे ब्रँडेड वस्तू, शुक्र म्हणजे भरपूर मित्र परिवार, मजा, मौज, मस्ती, खाणे, पिणे.

शुक्र म्हणजे कला,खेळ, क्रीडा, संगीत, गायन, नृत्य,नाटक, रंगमच असे विविध पैलू आहेत.कलाकारांसाठी शुक्रच चांगला पाहिजे.

शुक्र म्हणजे आर्ट, सॉफ्टवेअर Engg, फॅशन डिसाईन, वेब डिसाईन, ड्रॉईंग, वाहन डिसाईन, ब्युटी पार्लर, इंटिरियर डेकोरेशन, फाईन आर्ट.

शुक्र म्हणजे भौतिक सुखाचा कारक.

या शतकात राहू नंतर शुक्राला जास्त महत्व आले आहे. आजचे युग, सध्या चे ट्रेंड भौतिक सुखा कडे जास्त जाणारे आहेत. ह्या सर्वांचा कारक शुक्र आहे.

शुक्र छान तर सर्व छान.

 वृषभ व तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे.

शुक्र मीन राशीत उच्चीचा असतो, तर कन्या राशीत निचेचा असतो, निचेचा म्हणण्यापेक्षा weak असतो..

शुक्रा मुळेच प्रेम प्रकरणे होतात, प्रेम विवाह, प्रणय सुखा साठी शुक्र चांगला पाहिजे.  संतती साठी शुक्रच चांगला पाहिजे.

लग्न जुळवताना शुक्र बघतात.

अष्टक वर्गात शुक्राला एकूण 52 बिंदू दिले आहेत.

शुक्राला सप्तम स्थान, व्यय स्थान, पंचम स्थान, द्वितीय स्थान, लग्न स्थान ह्या स्थानात चांगले बिंदू पाहिजे म्हणजे विवाहा साठी चांगले व वैवाहिक सुखा साठी चांगले असते.

शुक्र बिघडला की वाईट सवयी लागतात. अति खर्च होतो. व्यसन लागते. हा मोह उत्पन्न करतो त्यामुळे नुकसान होतो.

गंमत म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलित व्यय स्थान म्हणजे 12 वे हाऊस, ह्यात मीन रास येते. व इथे शुक्र असेल तर तो उच्चीचा होतो.

आता हे व्यय स्थान म्हणजे जसे खर्चाचे स्थान आहे, तसे ते मोक्षाचे पण स्थान आहे.. आता मनुष्याला मोक्ष हवा असेल तर त्याने मोहा पासून दूर राहिले पाहिजे पण या स्थानातला शुक्र, जर व्यक्तीने स्वतःला कंट्रोल केले नाही तर खूप खर्च करतो..

 मग मोक्ष कसा मिळेल हा एक प्रश्न पडतो..

म्हणून काही जण दान धर्म करतात..

बाकी शुक्र कुठल्या स्थानात आहे, कुठल्या ग्रहा सोबत युती मधे आहे, कुठल्या ग्रहा ची दृष्टी आहे यावर सगळे अवलंबून आहे.

शुक्र बळ वाढविण्यासाठी ॐ शुक्राय नमः ह्या मंत्राचा जप करावा.