आजच्या युगात, आजच्या काळात कर्ज ही खूप सामान्य गोष्ट झाली आहे. सर्व बँक तुम्हाला कर्ज द्यायला एका पाया वर तयार आहेत. विविध गोष्टींसाठी कर्ज घेतले जाते. प्रत्येकाला luxury life हवे आहे त्या साठी तो काही ही करायला तयार आहे व या स्पर्धे मधून च कर्ज घेतात व नंतर कर्ज वाढत पण जाते..
घर घेण्यासाठी कर्ज घेणे हे अतिशय कॉमन आहे. काही जणांना आजार, हॉस्पिटल या साठी कर्ज घ्यावे लागते.काही जण शेयर मार्केट मधे पैसे गुंतवतात, नुकसान होते, मग परत कर्ज घेतात…
जेव्हा खूप कर्ज होते व कधी फेडले जाईल हा अंदाज येत नाही तेव्हा मग ज्योतिष्या कडे जातात…
जेव्हा जातक आपल्याला विचारतो, तेव्हा मग आपण नुसते षष्ठ स्थान च नाही तर पूर्ण कुंडलीचा सूक्ष्म अभ्यास केला पाहिजे.
मंगळ हा कॉमन ग्रह आहे की जो कर्ज दाखवतो, पण व्ययातला शुक्र पण खूप खर्च करवतो व माणूस कर्ज बाजरी होतो, कधी कधी सोने पण गहाण ठेवतो, अशी उदाहरण आहेत.
राहू हा पण temptation करतो व कर्ज वाढण्यास कारणीभूत ठरतो. शनि हा सुद्धा कर्जबाजरी करतो, कंगाल करतो.सर्व estate विकावी लागते.
त्यामुळे कुठले पाप ग्रह षष्ठ स्थानात आहेत किंवा त्यांची दृष्टी आहे ते बघणे आवश्यक आहे.
अष्टक वर्ग नुसार 30 पेक्षा जास्त बिंदू असतील, पण गुरु, बुध, शनि ला भिन्नष्टक मधे चांगले बिंदू असतील तर ती व्यक्ती कर्ज फेडू शकते. त्याची परतफेड ची क्षमता आहे की नाही हे बघू शकतो.