ज्योतिषातील नेपच्युन ग्रह महत्व

आपण नेहमी नवग्रह एवढेच म्हणतो, त्यात नेपच्युन चा समावेश नाही. आपल्या ऋषीं मुनींनी सात ग्रह च मानले.

नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून सर्वात दूर आहे. नेपच्यूनचा शोध शास्त्रज्ञांनी 1846 मध्ये लावला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यात नेपचून ला 165 वर्ष लागतात. एका राशीत हा 12 वर्ष 3 महिने असतो.

कल्पनाशक्तीचा आविष्कार अंतस्फुरती कारक नेपच्यून. स्वप्न शक्ती, यंत्र ज्ञान, गूढ शक्ती, समाधी अवस्था याच्या अंमलखाली येते. सिनेमातील प्रसिद्धी नेपच्युन मुळे मिळते.

नेपच्यून हा चंद्राच्या पुढची प्रतिभा दाखवितो चंद्र हा भरती-ओहोटीचा कारक असतो तर नेपच्यून हा निर्माण झालेला लाटा व तरंग दाखवितो

नेपच्यूनचा अंमल सुप्त अंतर्मनावर असतो त्यामुळे भ्रम कल्पनाशक्ती स्वप्ने अतींद्रिय अनुभव अंतःप्रेरणा शक्ति अंतर्मन याचा कारक नेपच्यून ठरतो

नेपच्यून ला परलोक विद्या जाणारा दुसऱ्यांच्या मनातले विचार ओळखणारा मनाने व्याधी निवारण करणारा जादूगार समजला गेले आहे

नेपच्यून ग्रहाची त्याची मीन ही उच्च राशी समजली जाते तर कन्या ही नीच राशी समजली जाते शत्रू राशी आहे

नेपच्यून हा गोड रसाचा सागरासारखा निळा वायव्य दिशेचा कारक समजला जातो रंगणार्‍या लहरी स्पंदन लहरी डोळ्यांमधली चमक याचा कारक नेपच्यून असतो

नेपच्यूनचा माणूस अगदी शांत थंड प्रेमळ उदात्त भक्तिरसात डुंबलेला दिसून येतो

नेपच्यूनचा अंमल अदृश्य मनावर असून गूढ अगम्य मनोविकार अंत स्पूर्ती यावर आहे

नेपच्यून हा बुद्धिमान व सुशिक्षित धार्मिक रुढीप्रिय वर्गावर प्रमुख कार्य करताना दिसतो गायक वादक तंतू वादक तत्त्ववेत्ते पुढे विद्येची आवड असणारे ज्योतिषी लोक भविष्यकार लोकांमध्ये नेपच्यून प्रभावी दिसून येतो

अंगात आळस येणे मानसिक वे ड झोपेत चालणे असाध्य आणि निदान होणारे रोग जलोदर दूषित पाण्याचे आजार नेपच्यूनचे दिसून येतात

रवी बरोबर नेपच्यून ची युती असता नेपच्यूनच्या स्पंदन लहरींना वाव मिळताना दिसतो चंद्राच्या कल्पकतेला नेपच्यून मुळे कल्पनाशक्तीची जोड मिळते

मंगळा बरोबर असता योग्य सामर्थ्याची शक्ती जोडून येते

बुधाबरोवर भविष्यकालीन व मनोविकार यांना उद्याच्या बुद्धीची व चतुर पणाची जोड मिळते नेपच्यून ची गुरु बरोबर युती श्रेष्ठ समजली जाते गुरुचे बौद्धिक कार्य याला नेपच्यूनच्या भक्ती रसाची जोड मिळते

 शुक्राबरोबर नेपच्यून कलात्मक व संवेदनशील तेला गायन वादन या रसाची जोड मिळते शनी बरोबर नेपच्यून असता नेपच्यून चे गुणधर्म आकुंचित होताना दिसतात खिन्नता उदासीनता मानसिकता दिसून येते

राहू बरोबर गुन्हेगारी मार्गाची जोड मिळताना दिसते तर केतू बरोबर भक्ती वादा बरोबरच जीवनात तंतुवाद्य याची विशेष आवड दिसून येते

साधू बैरागी यांच्यामध्ये परमार्थिक व संन्यास वृत्तीने वागणारी नेपच्यून आणि केतू ची जोडी दिसून येते

नवम स्थानात असेल तर अध्यात्म व गूढ शास्त्राची आवड असते. पूर्व जन्मीच्या काही गोष्टीमुळे त्यांना काहीतरी वेगळेच सुचते. स्वप्नातून काही गोष्टी कळतात. भविष्यवादी असतात. जलप्रवासात काळजी घ्यावी लागते.