चंद्र राहू युती – एक ग्रहण योग

या नावातच सगळ काही आल.

चंद्र म्हणजे मन. अतिशय चंचल. आपला एका मिनिटात मूड येतो व दुसऱ्या क्षणी मूड जातो…

सगळयांत जास्त गतीने फिरणारा ग्रह चंद्र. दर 2.25 दिवसांनी घर बदलतो व त्यानुसार आपले मन, विचार पण बदलत असतात.

अशा चंद्रा बरोबर जर युती मधे राहू असेल तर काय होईल हा विचार आपण सहज करू शकतो.

राहू हा काही ग्रह नाही, कुंडलीत त्याला बाकी ग्रहा प्रमाणे स्थान नाही. तो एक पात बिंदू आहे. तीज्या राशीत, ज्या स्थानात, ज्या ग्रहा बरोबर असतो त्याच्या प्रमाणे फळ देतो. सोबतचा ग्रह शुभ असेल तर शुभ फळात वृद्धी करतो, पण बरोबरचा ग्रह अशुभ असेल तर त्यात वृद्धी करतो.

चंद्र ज्या राशीत अशुभ असेल, निचेचा असेल तर राहू अजून त्याला खराब करेल…

हा ग्रहण योग पण पितृ दोषाचा एक भाग आहे.

व्यक्ती अति विचार करतो, खूप मानसिक त्रास होतो .

कुटुंब स्थानात असेल तर घरात नेहमी वादविवाद होत राहतात.

चतुर्थ स्थानात असेल तर आईशी संबंध बिघतात, प्रॉपर्टी वाद, वास्तु्दोष होतो, घरात अशांती.

तृतीय स्थानात असेल तर भाऊ, बहिणी शी पटत नाही, विनाकारण वादविवाद होतात…

पंचम स्थानात असेल तर शिक्षणात अडथळे आणतो, शिकायची इच्छा होत नाही किंवा चुकीची लाईन घेतली जाते.

प्रेम प्रकरणात अपयश येते.

षष्ठ स्थानात सहकारी त्रास देतात व व्यक्ती मानसिक रित्या खचून जातो…

व अष्टम स्थानात जास्त मानसिक आजार, त्रास होतो. नको, नको ते विचार येतात…

सप्तम स्थानात असेल तर वैवाहिक सुखात अडचणी येतात.

दशम स्थानात असेल तर नोकरीत त्रास होतो, नोकरीत अस्थिरता असते.

लाभ स्थानात कधी कधी अचानक धन लाभ करुन देतो.

द्वादश स्थानात गुंतवणूकीत त्रास, जेल यात्रा होऊ शकते…

चंद्र व राहू मधे 4-5 डिग्री फरक असेल तर जास्त उग्र फळे मिळतात.

जर चंद्र पॉवरफुल असेल तर शुभ फळ मिळते.धाडसी प्रवृत्ती वाढते, व्यक्ती आपल्या टार्गेट प्रमाणे काम करुन यश मिळवतो.

चंद्र, राहू ची डिग्री पाहून उपाय करावे.

उदा. पंचम स्थानात चंद्र, राहू पेक्षा कमी डिग्री असेल, व व्यक्ती शिक्षण घेत असेल तर, चंद्र स्ट्रॉंग करायला पाहिजे व त्यावर उपाय करायला पाहिजे.

जर राहू बलवान नसेल तर राहू चांगला करुन करिअर, नोकरीं मधे चांगले फळ मिळते.. राहू साधारण पणे वयाच्या 42-45 वर्षां नंतर चांगले फळ देतो.

आताच जे विचार मनात आले व जे बघितले आहे ते लिहिले.