g272001e7d079c3fb7431157c0dd5cd2a28601a79c79df7329811e1cfaf4ecfab3f7d64c2cb6121ab340dc07652ab3344ee58db29e18a8ee34b1b63cc2ab3eaf6_1280-2857274.jpg

शनी – राहू युती

शनी – राहू युती
सर्वांनी खूप ठिकाणी वाचले असेल की आता 29 मार्च ला शनी महाराज मीन राशीत प्रवेश करत आहेत. राहू मीन राशीतच आहे.
त्यामुळे शनी – राहू युती तयार होत आहे. 30 वर्षा नंतर ही युती होत आहे.. याला पिशाच योग म्हणतात.
राहू 18 मे 2025 ला कुंभ राशीत जाईल म्हणजे शनीच्याच राशीत जाईल…
अष्टक वर्ग मधे राहू चे भिन्न ष्टक नाही, असे म्हणतात की राहू सर्व साधारण पणे शनी सारखेच फळ देतो..त्यामुळे आपल्याला हा कालावधी कसा जाईल हे शनी च्या भिन्नष्टक पाहून आपण सांगू शकतो..
शनी ने भिन्नष्टक मधे किती बिंदू दिले ते बघून आपण हे सांगू शकतो. त्यामुळे 29 मार्च 2025 ते 18 मे 2025 हा कालावधी आपण निश्चित पणे अष्टक वर्ग वरून चांगल्या प्रकारे सांगू शकतो.
तर आपण अष्टक वर्ग बघा, शनी चे बिंदू बघा व त्या प्रमाणे उपासना करा.
0 ते 3 बिंदू – शनी ची उपासना लगेच सुरु करावी
4 बिंदू – मिश्र फळ
5,6,7 – चांगले शुभ फळ मिळेल..
राहू चे या प्रमाणेच समजावे..
शनी, राहू हे मित्र नाही किंवा शत्रू नाहीत.. आपणास माहिती आहे राहू ज्या राशीत आहे व ज्या ग्रहा सोबत आहे त्या नुसार फळ देतो..
खूप जण टेन्शन मधे आले आहेत.. मला खूप जणांचे फोन येत आहेत म्हणून लिहीत आहे..
त्यांना धीर द्यायची गरज आहे व नीट समजावून सांगण्याची गरज आहे..
शनी म्हणजे विलंब, राहू म्हणजे temptation.. राहू उकसवतो म्हणून शांत राहावे..
हे 51 दिवस – 18 मे पर्यंत शांत राहावे.. मोठे निर्णय घेतांना अष्टक वर्ग बघून घ्यावे व त्या प्रमाणे निर्णय घ्यावा..
6 8 12 शी संबंध असेल तर जास्त काळजी घ्यावी..
नोकरी बदल, जागा बदल, परिवर्तन योग येऊ शकतो..
परदेश गमन किंवा घरा पासून दूर जाऊ शकतात..
जर शनी अशुभ असेल तर धन हानी, नुकसान असे होऊ शकते.
शेयर मार्केट मधे गुंतवणूक करतांना नीट विचार करुन निर्णय घ्यावा..
अशा पद्धतीने आपण बघू शकतो.
शुभम भवतु!!
🙏