ज्योतिष मार्गदर्शन आणि सल्ला

माझेमनोगत
श्री हेमंत शंकर उपासनी
लहानपणापासूनच मला ज्योतिष शास्त्राची आवड होती. माझे आजोबा ज्योतिषी होते. त्यांनी 1955 च्या सुमारास नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर ज्योतिष शास्त्राचे शिक्षण घेतले आणि सखोल अभ्यास केला. कदाचित त्यामुळं माझ्यातही ही आवड निर्माण झाली. मी वाचन करायचो, परंतु नोकरीच्या व्यस्ततेमुळे वेळ मिळत नव्हता. मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होतो. निवृत्तीनंतर मी ज्योतिष शास्त्राकडे वळलो. मला चांगले शिक्षक आणि गुरु मिळाले – सौ. सुवर्णा सूत्रावे ताई आणि सौ. समीक्षा ताई. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आणि अजूनही शिकत आहे. त्यांचा मी ऋणी आहे. मी अनिरुद्ध ज्योतिष संस्थेशी संलग्न आहे. या संस्थे मध्ये मी ज्योतिर्विद्या वाचस्पती केले. वैदिक ज्योतिष बरोबरच मला अष्टक वर्गाबद्दल खूप आवड निर्माण झाली. ज्योतिष शास्त्राबरोबरच अष्टक वर्गाचा अभ्यास चालू आहे, आणि त्यात संशोधनही सुरू आहे. तसेच अष्टक वर्गावर अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थे तर्फे काही कार्यशाळा घेतल्या आहेत.